Share

पालकमंत्र्यांनी अचानक गाडी थांबवत घेतली नागरिकांची भेट, समस्या सोडवण्याचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्हाचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लातूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांशी संवाद साधला. विलास नगर परिसरात असलेल्या समस्या आणि मिळत असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. इतकेच नाही तर या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

लातूर शहरातील नियोजित कार्यक्रमाला जात असताना शनिवारी पालकमंत्री अमित देशमुख यांनी विलास नगर परिसरात थांबून इथल्या नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील नागरिकांना असलेल्या समस्या तातडीने सोडण्यासंदर्भातल्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही समस्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

लातूर शहर महानगर पालिकेतही काँग्रेसचाच महापौर आहे. त्यामुळे अमित देशमुख यांचे महानगर पालिकेवरही लक्ष असते. याच माध्यमातून त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!