सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला होता. यानंतर आता दादरा नगर हवेली लोकसभेची पोटनिवडणूक लागली आहे. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आज शनिवारी दादरा नगर हवेली दौऱ्यावर आहेत. यानिमित्त राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. ‘रेल्वेमंत्री प्रचाराला येत आहेत, इतर मंत्रीही येतील, हवे तर जो बायडन यांना प्रचाराला आणा शिवसेना घाबरत नाही, असा टोला राऊतांनी लगावला.
राऊत म्हणाले, ‘रेल्वेमंत्री गेल्या चार दिवसांपासून सिल्वासामध्ये येऊन बसले आहेत. रेल्वे मंत्रालयाला काहीच काम नाही का ? की एअर इंडियासारखा लिलाव करून टाकला आहे? भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जो बायडन यांना आणावं. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातले संपुर्ण मंत्रीमंडळ विधानसभा निवडणूकीसाठी उतरले होते. पण ममता बॅनर्जींसमोर भाजपचे काहीच चालले नाही. त्याच पद्धतीने सिल्वासामध्ये भाजपचे काहीही चालणार नाही. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला सहानभूतीची गरज नाही, असेही ते म्हणाले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असे म्हणत आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे’, असही संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

