Share

‘मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘विचार एकच असल्यामुळे आम्ही युती केली होती. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर तुम्ही परत मुख्यमंत्री झाले असता. मी केवळ शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. कारण शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं वचन दिलं होतं आणि ते मी पूर्ण करणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या दसरा मेळाव्यात म्हणाले होते.

यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करावा असा खोचक सल्ला वाघ यांनी दिला आहे.

‘मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना या शब्दांत चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

‘मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो. कारण माझे हे क्षेत्रच नाही. केवळ मुलाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या क्षेत्रात आलो आणि जी परिस्थिती येत गेली त्याला सामोरा जात गेलो आणि आज पाय रोवून भक्कमपणे उभा आहे. एका निश्चयाने मी पुढे जात आहे, असे ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!