Share

कृषीविषयक शिक्षकांच्या एक लाख जागा भरण्यास शासनास भाग पाडू- आमदार डॉ. राहुल पाटील

Published On: 

परभणी : राज्यातील सुमारे ८० हजार शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावर कृषी विषय शिकवणाऱ्या एक लाख शिक्षकांच्या जागा निर्माण होणार आहेत. त्या तातडीने भरण्यासाठी राज्य शासनास भाग पाडू, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले आहे. राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल परभणी येथील विविध शैक्षणिक संघटना व शिक्षकांच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते.

शालेय शिक्षणात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर कृषी विषयाचा समावेश करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. हा विषय शालेय स्तरावर शिकवण्यासाठीचा निर्णय घेण्याचा पाठपुरावा २०१४ पासून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केला होता. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने कृषी हा विषय शालेय स्तरापासून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.

शालेय स्तरावर कृषी विषय शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून शेती आणि त्या संबंधी आवड निर्माण होईल. त्याचा फायदा कृषी क्षेत्राला होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेती ही पावसावर अवलंबून असल्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे कायम नुकसानीची शेती होत आहे. मात्र, कृषी अभ्यासक्रमामुळे यातून मार्ग निघण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!