🕒 1 min read
नवी-दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखत दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात असे हे सत्य आहे असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. त्यांना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती, तिला पंतप्रधान मोदींनी उभे केले असेही शहा म्हणाले. तसेच मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात का?, असा सवाल केला असता मोदी सर्वांचे ऐकून घेतात आणि नंतरच निर्णय घेतात, असे थेट उत्तर शहांनी यावेळी दिले.
पंतप्रधान कुणाचेच ऐकत नाहीत का? एकटेच निर्णय घेतात का? मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात का? यात किती तथ्य आहे? असं अमित शहा यांना विचारलं असता, मी मोदींसारखा श्रोता आजवर पाहिलेला नाही. मी मोदींचे काम जवळून पाहिले आहे. ते धैर्याने निर्णय गेतात. ते शेवटच्या व्यक्तीचंही म्हणणं ऐकून घेतात. एखाद्या व्यक्तीने सूचवलेली गोष्ट महत्त्वाची असेल तर त्याचा स्वीकारही करतात. तो मुद्दा कुणी मांडला हे महत्त्वाचे नसते. तर तो मुद्दा किती महत्त्वाचा आहे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते, असे शहा म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जेव्हा मोदींना भाजपामध्ये पाठवण्यात आले, तेव्हा त्यांना संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती आणि देशात पक्षाच्या दोन जागा होत्या. त्यानंतर ते संघटना मंत्री झाले आणि १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. पहिल्यांदाच भाजपा स्वबळावर महापालिकेत सत्तेवर आला. त्यानंतर भाजपाचा प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. त्यानंतर १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपाने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही’ असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा
- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा!’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
