Share

तीन नाहीतर 6 जणांना पुराव्या अभावी दिलं सोडून; मलिकांच्या आरोपानंतर एनसीबीचं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी गंभीर आरोप केलेत. काही वेळांपूर्वीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलं. त्यानंतर एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे.

एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं  गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.  तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे.

NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत आहे. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती. तसंच आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे. कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!