Share

वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सरकारमध्ये चाललेय तरी काय ? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ ! असं म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. ️

फडणवीस म्हणाले, मार्च, एप्रिल, मे 2021 मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 ला, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार?‘वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का असे धडपडतेय्?

विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत?मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक आहेत.️ मार्च ते मे 2021 मध्ये करण्यात आलेल्या मदतीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त देण्यात आले आहेत.

जुलै 2021च्या मदतीची भरघोस घोषणेवर देखील फडणवीस यांनी भाष्य केले आहे. नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रूपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रूपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये! शेतकऱ्यांच्या प्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय ? असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!