Share

‘दादरा नगर हवेली शिवसेनाच जिंकणार, संजय राऊतांचा दावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात 30 विधानसभेच्या जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका पार पडणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा रिक्त आहेत. दादरा आणि नागर हवेली आणि दमन, मध्य प्रदेश-खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा या जागांचाही यात समावेश आहे. त्यासोबतच 14 राज्यांच्या 30 वेगवेगळ्या विधानसभेच्या जागांसाठीही पोटनिवडणुका होणार आहेत. आता यासाठी भाजप आणि शिवसेनेत आता पुन्हा एकदा सत्ता लढाई सुरु झाली आहे.

तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दादरा नगर हवेली शिवसेनाच जिंकणार असा दावा ट्वीट करत केला आहे. दुसरीकडे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कला बेन देलकर यांनी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता आता दाट झाली आहे.

दरम्यान भाजपकडून महाराष्ट्रातून सुभाष साबणे, दादरा आणि नगर हवेलीहून महेश गावित, मध्य प्रदेशातील खंडवामधून ज्ञानेश्वर पाटील आणि हिमाचल प्रदेशातील मंडिहून ब्रिगेडियन खुशाल ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता संजय राऊत यांचा दावा कितपत खरा ठरणार हे येणारी निवडणूकच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!