मुंबई : अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापाई राज्य सरकारने १२२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत शेतीपिकांसह फळबागांचे नुकसान झाले होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नुकसानीपायी बाधित झालेल्या क्षेत्रासाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपायी मदत करण्यासाठी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करुन एकूण १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. तसे आदेश विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्ताना दिले आहेत.
यात कोकण विभागासाठी २९ लाख ३० हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये, पुणे विभागासाठी ३ कोटी १६ लाख ७५ हजार रुपये, नाशिक विभागासाठी ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये, अमरावती विभागासाठी ३८ कोटी ८७ लाख ५६ हजार रुपये तर नागपूर विभागासाठी ५ कोटी ४ लाख ८१ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय- अजित पवार
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देश अंधारात बुडण्याची भीती, केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर…; सामनातून केंद्रावर निशाणा
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

