🕒 1 min read
लातूर : साई, नांदगाव, रायवाडी, नागझरी व जेवळी या गावांचा पॉवर ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे दोन दिवसापासून विद्युत पुरवठा बंद होता. हा पुरवठा पुर्ववत करण्यासाठी या गावच्या नागरिकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी समाज माध्यमातून संपर्क केला होता. त्या नुसार युद्ध पातळीवर काम करण्यात आले असून अखेर या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
हरंगुळ सब स्टेशन वरून साई, नांदगाव व नागझरी या गावांना विद्युत पुरवठा जोडण्यात आला असून टाकळी सब स्टेशन वरून नागझरी व जेवळी या गावांना विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. या सर्व गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. विदयुत पुरवठा पुर्ववत करून ग्रामस्थांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सामसे व उपअभियंता राख यांना पालकमंत्री देशमुख यांना सूचना दिल्या होत्या.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात अनेक गावांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करवा लागतोय. त्यातच विद्युत पोल पडल्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. अखेर या गावांचा विद्युत पुरवठा दोन दिवसानंतर सुरू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितची एन्ट्री; आंबेडकरांकडून विश्वासू सहकाऱ्याला तिकीट
- नवाब मलिकांच्या आरोपावर मनिष भानुशालीचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
