🕒 1 min read
मुंबई – माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या ७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणाऱ्या सुमारे ८ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील बूथ समित्यांची, शक्ती केंद्रांची रचना पूर्ण केली जात आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या समर्थ बूथ अभियान व सेवा – समर्पण अभियानानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस हे शक्ती केंद्र व बूथ समिती प्रमुख तसेच बूथ समिती सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, यावेळी पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावाही फडणवीस यावेळी घेणार आहेत.एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने एकाच वेळी ८ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा विक्रम या संवादाच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे, असे उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय- अजित पवार
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देश अंधारात बुडण्याची भीती, केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर…; सामनातून केंद्रावर निशाणा
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
