🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे ठाकरे सरकार तसेच विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपाचे सामने बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.
शालिनी यांनी ट्विट करत खोचक सवाल केला आहे की,’उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?’ उद्यापासून देशभरात नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करत सरकारने काही नियमावली जारी केली आहे. यालाच अनुसरून शालिनी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विट सोबतच त्यांनी महिला अत्याचार, ओला दुष्काळ आणि खड्डेमय रस्ते अशा हॅशटॅगचाही वापर केला आहे.
उद्यापासून 'घट' बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?#महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते #
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 6, 2021
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि जवळील भागात असलेल्या खड्ड्यांवरून देखील नेते मंडळी आमने-सामने आले आहेत. शिवसेना या सगळ्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मुंबई महापालिकेचे प्रचंड बजेट जास्त असून देखील तेथील रस्त्यांची दुरावस्था कशी? असा सवालही केल्या जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
