Share

राज्यातील जि.प. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दबदबा, पाहा कोणाच्या पारड्यात किती जागा

Published On: 

मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांतील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज या जागांचा निकाल लागला. निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यात काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांकडे गेल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील १६ पैकी १६ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ९ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर भाजपाने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरीत २ जागांवर इतरांनी बाजी मारली. वाशिममधील १४ पैका १४ जागांचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादीने ५, काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २, शिवसेनेने १ आणि इतरांनी ४ जागांवर कब्जा केला.

तर पालघरमध्ये १५ पैकी १५ जागांचे निकाल समोर आलेत. येथे भाजपा आणि शिवसेनेने प्रत्येकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. तर एक जागा इतरांच्या खात्यात गेली आहे.

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १४ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसच्या खात्यात प्रत्येकी १ तर राष्ट्रवादीच्या खात्यात दोन जागा गेल्या आहेत. तर ९ जागांवर वंचित आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागांचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपाने ४, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे जिल्ह्यातील १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने ८, राष्ट्रवादीने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!