🕒 1 min read
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही सुरू आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
सर्वांनाच ज्याप्रकारी ट्रीटमेंट यूपी सरकार देत आहे, हे थेट लोकशाहीची हत्याच आहे. भलेही एकदोन दिवस तुम्ही हे कराल. मात्र, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. सरकारकडून दुख व्यक्त करणे तर लांबची गोष्ट आहे. जालियानवाला बाग हत्याकांडासारखीच ही घटना आहे. मात्र, याचं उत्तर सरकारला द्यावचं लागणार आहे अशी पवार यांनी केली.
आपल्या अधिकारासाठी उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्यात आलं. या हल्ल्याचा मी निषेध करतो. केवळ निषेध नाही तर या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी. केंद्र असो की उत्तर प्रदेश सरकार, अंगावर गाडी चालवली गेली, त्यात काहींचा मृत्यू झाला. जे काही समोर आलं, त्यानुसार आठ शेतकरी मृत झाले, याची जबाबदारी भाजप सरकारची आहे. उत्तर प्रदेश सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हवेत, म्हणजे सत्य समोर येईल, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘कितीही नौटंकी केली तरी..’ निलेश राणेंचा प्रियांका गांधींना खोचक टोला
- ‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
