Share

‘बिग बॉसच्या घरात राहिला पैसे मिळत असले तर…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर ट्रोल झालेल्या शमिताचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी बिग बॉसमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच पार पडलेल्या बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र शिल्पा शेट्टीचा प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. घरात इतके मोठे संकट असताना शमिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. यावरून तिला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. द

बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी सांगितल आहे. शमिता म्हणाली, “माझ्यासाठी ते सर्व खूप कठीण होतं, कारण तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. दुर्दैवाने माझा कोणताही दोष नसताना मला खूप ट्रोल करण्यात आलं. माझ्या कुटुंबालाही त्यावेळी वाटले होत की अशा परिस्थितीत मी बिग बॉसच्या घरात असणे माझ्यासाठी चांगले आहे.’

‘मी आधीच बिग बॉसची कमिटमेंट दिली होती. मला माझ्या शब्दावर टिकून राहायचं होतं. ‘शो मस्ट गो ऑन’ या नियमाप्रमाणे मी माझे निर्णय घेत गेली या कोविड काळात लोक काम नाही म्हणून घरी बसले आहेत. काहींनी त्यांच्या हातातील काम गमावलं. अशा वेळी जर मला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी पैसे दिले जात आहेत, तर मी नाही का म्हणू.’ असे तिने स्पष्ट केले आहे. नुकतेच शमिताने बिग बॉस १५ च्या सीजनमध्ये सहभाग घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!