Share

घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम

Published On: 

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर पूर्वीपासूनच आहे. फडणवीसांमुळेच भाजपा सोडत असल्याचा आरोप त्यांनी पक्ष सोडताना केला होता. आता पुन्हा एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर निशाना साधला आहे. घरी जा गुगलवर टरबूज ऑफ महाराष्ट्र असं सर्च करा असे काम त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरातील जोंधणखेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ असा आवाज दिला. त्यावर एकनाथ खडसेंनी मला माहिती नाही असे म्हंटले. मात्र कार्यकर्ते आवाज काढतच होते. त्यावर खडसे म्हणाले, पण मला एक माहिती आहे. घरी गेले की पहिले हे काम करा, गुगलवर जा आणि टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण? असे सर्च करा. घरी गेले की सर्वात आधी हे काम करायचं’ असा सल्ला खडसेंनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले, जामनेरवाल्याने माझ्या मागे ईडी लावली, असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाना साधला. नाथाभाऊंच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्सवाले येऊन गेले. एकदा तर धाड टाकली होती. मी फार्म हाऊसवर राहत असल्याने तुम्हाला माहिती नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला कोणताही गुन्हा केला नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!