🕒 1 min read
चंदीगड : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी गेल्या १० महिन्यांपासून दिल्लीतील सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अजूनही यावर कोणताही तोडगा काढता आला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात असतानाच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या’, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले. चंदीगड येथे एका कार्यक्रमात बोलताना मनोहर लाल खट्टर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. खट्टर यांच्या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे. लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. आम्हीही पाहून घेऊ. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे खट्टर यांनी म्हटले आहे.
अगर प्रदेश का मुख्य मंत्री ही हिंसा फैलाने, समाज को तुड़वाने और क़ानून व्यवस्था को ख़त्म करने की बात करेंगे, तो प्रदेश में क़ानून और सविंधान का शासन चल ही नही सकता।
आज भाजपा के किसान विरोधी षड्यंत्र का भंडाफोड़ हो ही गया।
ऐसी अराजक सरकार को चलता करने का समय आ गया है। pic.twitter.com/kSgk8kiCUx
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 3, 2021
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने प्रत्युत्तर दिले असून, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या उचलून शेतकऱ्यांना विरोध करायला सांगून प्रोत्साहन देणे अतिशय निंदनीय आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्याचा निषेध करतो. तसेच मुख्यमंत्री खट्टर यांनी माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’ अन् त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’; राऊतांचा निशाणा
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
