Share

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे; शेकापच्या रमेश मोरेंची टीका

Published On: 

रायगड : राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे याच्या नावे असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान तर्फे अगंणवाडी सेविकांना साहीत्य वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये जे मदत म्हणून साहित्य वाटप केले त्यावर सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान, पुरग्रस्तांसाठी मदत या नावाचे लेबल तसेच्या तसे लावलेल्या अवस्थेत आढळले.  याबाबत माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी माणगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे कार्यकर्ते आहेत. असं म्हणत राष्ट्रवादीच्या आणि सुनिल तटकरे युवा प्रतिष्टानच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मोरेंनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटून राजीनाम्याची मागणी करणार राज्यपालांना या सदंर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पालकमंत्री अदिती तटकरे याच्यां राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे रमेश मोरे यांनी सांगितले.
सेना नेते आणि माजी केद्रींय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि सुनिल तटकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीतील शेकापने राष्ट्रवादी पक्ष, सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान सह पालकमंत्री अदिती तटकरे याच्यांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलो तरी सहकारी पक्ष जिते चुकतो ते चुकीचच आहे. 22, 23 जुलै रोजी रायगडमध्ये आलेल्या पुरग्रस्तांची क्रुर चेष्टा राष्ट्रवादी केल्याने आपण पालकमत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, असं रमेश मोरेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!