मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या सुधारणा अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असून सदर अध्यादेश ३० सप्टेंबर रोजी प्रख्यापित झाला आहे. महापालिका निवडणुकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती, मात्र सध्याची कोविडची परस्थिती पाहता आणि महापालिका प्रशासनांना कामकाज प्रभावी व सुरळीत करता यावे, यासाठी प्रभाग सदस्य पद्धतीत बदल करण्यात येत आहे, कारण नगर विकास विभागाने अध्यादेशामध्ये नमूद केले आहे.
मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाने सदर अध्यादेश २८ सप्टेंबर रोजी राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेची सुधारणा आहे.
मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी निर्णय झाल्यानंतर पुन्हा एक सदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी केली होती. २०१९ च्या सुधारणा अधिनियमांव्दारे महापालिकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यानी मंत्रिमंडळाच्या निर्णयावर ठामपणाची भुमिका घेत अध्यादेश राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठविला होता.
आगामी काळात राज्यात १८ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत आघाडी सरकारच्या घटक पक्षांत तीव्र मतभेद होते. मात्र आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कमोर्तब झाले आहे. ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सदर अध्यादेश दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


