🕒 1 min read
परभणी : राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भामध्ये तसेच राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीकाचं, जमिनीचं मोठं नुसकान झालं आहे. शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानीचे पंचनामे राज्य सरकारकडून सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस हे नुकाग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही शेतकऱ्यांच्या पीकाची पाहणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही पेरणी तर वाया गेलीच पण, सोबतच शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना जर कधी रब्बी पेरणी करायची असेल तर सरसकट एकरी 50 हजार रुपयांची राज्य सरकारने करावी, अशी मागणी यावेळी दानवेंनी केली आहे.
????पालम जिल्हा परभणी
अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजारांची मदत सरकारने द्यावी.@BJP4Maharashtra @BJP4AurangabdR #MaharashtraRains #Maharashtra #Marathawada #cropdamage #farmer pic.twitter.com/pDF6zEzdG7— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) October 3, 2021
शेतकऱ्यांनी खरीप पीकासाठी जे कर्ज उचललं ते कर्ज सरकारने माफ करावं, अशीही मागणी यावेळी रावसाहेब दानवेंनी केली आहे. दानवेंनी परभणीतील पालम येथील शेतकऱ्यांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

