Share

‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे!’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

धुळे : शरद पवार यांना पंतप्रधान तर, अजित पवार यांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. कोल्हेंनी ही इच्छा बोलून दाखवल्यानंतर यावर प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. मात्र, त्यांच्या मतामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोलताना अजित पवारांच्या कार्यक्षमेतवर भाष्य केले.

त्या म्हणाल्या, ‘अजितदादा हे प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ती आहे. अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचे मी मध्यंतरी ऐकले होतं. परंतु, ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे’ अशी मागणीच त्यांनी केली.

एवढी क्षमता असलेल्या नेत्याला केवळ पुण्यातील पिंपरी-चिंचवडपर्यंतच अडकवून टाकल्यासारखी स्थिती सध्या दिसत आहे. यामुळेच त्यांच्या पक्षातील खासदाराने पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत ही खदखद व्यक्त केली असावी असे मला वाटते असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!