मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता गांधी भवन येथे ते पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
परमबीर सिंग यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमबीर यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला.
एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, त्यांनी उत्तर दिले नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

