पुणे – तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा निकाल दिला.
मारणे याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया विरोध केला. हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेला कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला धांगडधिंगाही अंगलट आला होता. तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर तीनशे गाड्यांसह काढलेली मिरवणूक त्याला पुन्हा तुरुंगाच्या वाटेवर घेऊन गेली. यानंतर साताऱ्यातील जावळी तालुक्यात गजा मारणेला फिल्मी स्टाईल बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेने पुण्याच्या अंडरवर्ल्ड क्षेत्रात आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

