🕒 1 min read
अकोला : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील 182 परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील 12 लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. नाशिक मधील गंगापूर धरणातून 3426 क्यूसेक पाणी सोडावे लागल्याने, तसेच खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नदीकाठच्या शेत जमीन व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उठण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. झालेले नुकसान व हवामान खात्याने वर्तवलेले आगामी संकटाचे अंदाज पाहता राज्य व केंद्र सरकारने शेतकरी व आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता करण्याची व आगामी संकटापासून बचावासाठी सावध करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपत्तीच्या अशा भीषण कालावधीमध्ये राजकीय पाहणीचे दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता राजकारण बाजूला ठेवत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी असे आव्हान किसान सभा करत आहे.
केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत व त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघेल अशी ठोस मदत करावी, अशी मागणी किसान सभा करत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतावर व पिकांवर ओढवलेल्या आपत्तीची सूचना देता यावी यासाठी कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. पीक विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन 24 तास सुरू राहतील अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाईन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाईन सूचना स्वीकारण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांनी करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही, आमची पक्षबांधणी उत्तम; संजय राऊत कडाडले
- ‘सरड्याचे बदलते रंग! कन्हैया कुमार भाजपातही जाऊ शकतो’
- राज ठाकरेंनी ‘ती’ मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही – गुलाबराव पाटील
- अमित शहांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, भाजप प्रवेशावर म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

