🕒 1 min read
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपण भाजपमध्ये जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपमध्ये जात नसलो तरी काँग्रेसमध्ये राहणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे.
पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असणारे काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता पुढच्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, खुद्द सिंग यांनी याचे खंडन केले आहे. ते म्हणाले, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. अशाप्रकारचा अपमान मी सहन करणार नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीये.
‘आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे. ज्या प्रकारे आमदारांची बैठक बोलवून ऐनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असा सवालही त्यांनी उपस्थित करत काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सिद्धू हे काही टीम प्लेअर नाहीत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी टीम प्लेअरची गरज आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची लोकप्रियता घटत आहे. लोकांमध्ये आम आदमी पार्टीबद्दल आकर्षण वाढत आहे. यावेळची पंजाब निवडणूक खूप वेगळी असणार आहे. काँग्रेस-अकाली दल पहिल्यापासूनच येथे आहेत. आता आम आदमी पार्टीदेखील वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

