Share

‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा केला. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने तसे कळवले आहे.

यावरून तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांचे उभे पीक वाहून गेले असून शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी राणा पाटील यांनी केली आहे.

‘शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तत्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षा आहे. अशावेळी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असे सांगून भागणार नाही. तर त्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका घ्यायला हवी. शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी आज मराठवाड्यातील पूरस्थितीबाबत बैठक घेऊन पूरग्रस्तांच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचावकार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!