🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीही ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर येत्या एक ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत दहा रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, शिवभोजन थाळीचीही संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे.
यावर आता भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया आली आहे ‘ही फुकटची थाळी खाणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्तेचं आहेत, ही योजना पण एक मोठा भ्रष्टाचार आहे. रत्नागिरीमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन ह्या योजनेची पोलखोल केली होती, थोडक्यात बोगस यादी पाठवली जाते आणि ठेकेदाराला पैसे मिळतात. शिवभोजन थाळी चालवणारे ९०% शिवसेना व राष्ट्रवादीचे आहेत’. असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
ही फुकट खाणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्तेचं आहेत, ही योजना पण एक मोठा भ्रष्टाचार आहे. रत्नागिरीमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन ह्या योजनेची पोलखोल केली होती, थोडक्यात बोगस यादी पाठवली जाते आणि ठेकेदाराला पैसे मिळतात. शिवभोजन थाळी चालवणारे ९०% शिवसेना व राष्ट्रवादीचे आहेत. https://t.co/EhIcNOigfE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 29, 2021
तर याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘१ ऑक्टोबर पासून म्हणे मोफत असलेली अदृश्य शिवभोजन थाळी १० रुपये मोजून घ्यावी लागणार आहे. शिवाय त्याची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. कुठे दिसली नाही कधी ही थाळी’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शिवभोजन थाळीला अदृश्य थाळी असे संबोधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला थेट इशारा
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
