Share

चीनचा उत्तराखंडच्या बदाहोटीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

Published On: 

🕒 1 min read

उत्तराखंड : मागील महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडच्या बदाहोटी भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्तामुळे सध्या सर्वत्रच खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे. याविषयी बोलतांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘सध्या आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही’, असे सांगितले आहे. धामी असे म्हंटले असले तरी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल यांनी राज्याच्या सीमेवरील या घुसखोरीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.

१९६२ पूर्वीपर्यंत उत्तराखंडच्या धोरण घाटीचे मेंढपाळही येथे येत-जात होते. मात्र,त्यानंतर हे थांबले. परंतु त्यानंतर आता गेल्या काही काळापासून चिनी सैनिक अनेक वेळा येथे दिसले आहेत. ते या भागात येतात, फिरतात, सिगारेट आणि इतर कोणतेही रॅपर फेकतात. सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्टच्या आसपास या भागात मोठ्या संख्येने चिनी सैनिक आले होते.

दरम्यान, हे प्रकरण दोन देशांच्या संबंधांशी निगडित असल्याने या प्रकरणी राज्य सरकार आणि अधिकारी सावधगिरीने बोलत आहेत. परंतु उत्तराखंडचे माजी राज्यपाल बी के जोशी आणि माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी बडाहोटी परिसरात चिनी घुसखोरीचा प्रयत्न होत राहील असल्याचे रेकॉर्डवर म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!