🕒 1 min read
बीड : काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील झरे या गावात बैलगाडी शर्यत भरवली होती. यावेळी पोलीस काय कारवाई करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर विनापरवाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग करुन बैलगाडी शर्यत घेतल्यामुळे तसेच कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्या अंतर्गत गोपीचंद पडळकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान काल बीडमधील इमामपूर या गावामध्ये बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती. सध्या राज्यात बैलगाडी शर्यत भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी आहे मात्र तरीही बीडमध्ये बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती. यावेळी शिवसेना तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या शर्यतीचे उदघाट्न केले होते.
या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती असताना देखील केवळ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी देखील स्थानिक पोलिस आणि प्रशासन शिवसेना तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शाहू महाराजांचे दलितांना स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणार- समरजित राजे घाटगे
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
