Share

राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पार्टी; सैन्यातील जुन्या मित्रांसोबत गायले गाणं

Published On: 

🕒 1 min read

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग आता आपला वेळ जुन्या मिंत्रांसोबत घालवीत आहेत. शनिवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या सैन्यातील जुन्या मित्रांसाठी मोहाली येथील मोहिंदर बाग फार्महाऊसवर एक पार्टी आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी गाणंही गायलं.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नुकताच भांगडा नृत्य करण्याचाही व्हिडीओ समोर आला होता. अभिनेत्री स्वरा भास्करनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी चर्चा झाली होती. आताही त्यांचा मित्रांसोबत गाणं गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातून विलिप्त होत ते एक सुंदर वयक्तिक आयुष्य जगत आहेत, त्यामुळे त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा अधिकार राजकारण्यांना नाही, अशा अनेक प्रतिक्रिया त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला येत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग मित्रांसोबत खूप आनंदी दिसत होते. त्यांनी एनडीए ४७ तुकडीच्या आपल्या सर्व जुन्या मित्रांना मिठी मारुन स्वागत केले. सर्वांनी सैन्यातील आठवणी ताज्या केल्या. ‘ओ गोरे गोर..’ ही जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे त्यांनी यावेळी गायले.

याबाबत अमरिंदर सिंग यांचे माध्यम सललागार रवीन ठुकराल यांनी ट्विटरवर याबाबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत १९५० मधील हिंदी बॉलिवूड चित्रपटातील ओ गोरे गोर… हे गाणे गायले. तसेच त्यांचे वर्गमित्र आशा सिंह मस्ताना यांनी ‘इधर कान कान उधर कंकर’ हे लोकप्रिय पंजाबी गाणे गायले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले. पंजाब काँग्रेसमधील अतंर्गत कलहामुळे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर चरणजीत चन्नी यांनी मुख्यमत्री पदाची शपथ घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!