औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना दिले. ते गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गंगापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंचनामे वेगाने करण्याच्या सूचना देऊ, असे ते म्हणाले.
खासदार इम्तियाज यांनी ढोरेगाव, सोलेगावसह गंगापूर तालुक्याचा दौरा केला. मालुंजा येथील शिवना नदीवरील पुलाची पाहणी करून भालगाव मेंढी, झोडेगाव, वाडगाव, मांजरी येथील अतिवृष्टीने व शिवना नदीला आलेल्या पुरामुळे शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
प्रथम त्यांनी ढोरेगाव शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून दौऱ्यास सुरवात केली. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अयुब पटेल यांनी ढोरेगाव ते कदीम शहापूर जाणाऱ्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था दाखवली. मालुंजा येथील शिवना नदीवरील धोकादायक फुलाची पाहणी केल्यानंतर खासदार जलील यांनी मेंढी येथे पडझड झालेल्या जिल्हा परिषद शाळा खोलीची पाहणी करून खरडून गेलेल्या शेतीची, पिकाची पाहणी केली. यानंतर भालगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन एका सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- “अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे ही परीक्षा रद्द झाली का?”
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- नगरचा डंका देशभरात गाजला; यूपीएससी परीक्षेत चार मुलं यशस्वी
- काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
