मुंबई –आचार्य रजनीश तथा ओशो हे अध्यात्मिक गुरु म्हणून जगप्रसिध्द असून त्यांचे जगभरात अनुयायी आहेत. आचार्य रजनीश तथा ओशो यांचे निधन होऊन 21 वर्षे लोटली आहेत.या काळात त्यांच्या पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैर कारभार केले आहेत. मागील 50 वर्षे जे अनुयायी आचार्य रजनीश तथा भगवान ओशो यांची सेवा करीत होते अशा अनुयायांना ही पुण्यातील ओशो आश्रमात प्रवेश दिला जात नाही.
ओशो आश्रमाची पुण्यात एकूण 20 एकर जमीन असून त्यातील 8 एकर जमीन ओशो आश्रमाच्या विद्यमान संचालकांनी विकली आहे.त्या व्यवहारास 3 हजार 200 लोकांनी आक्षेप घेणारे धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केले आहेत. ओशो आश्रमाचे नाव बदलून ओशो रिसॉर्ट करण्यात आले आहे.त्यामुळे ओशो अनुयायांच्या भावना दुखविण्या बरोबर आश्रमाच्या नावाने मोठे गैरव्यवहार ओशो आश्रम संचालक करीत असून याची भारत सरकार ने सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी ओशो अनुयायांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कडे केली.
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले,ओशो अनुयायांचे प्रमुख योगेश ठक्कर उर्फ स्वामी योगेश ; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण मिलन शुक्ला ; रिपाइं राज्य उपाध्यक्ष विलास तायडे ; माँ आरती राजधान; हेमा बावेजा ठक्कर; आदींच्या प्रमुख उपस्थितीत ओशो अनुयायांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ओशो आश्रमात होत असलेले गैरव्यवहार; तसेच आर्थिक घोटाळा; तसेच राज्य आणि केंद्र सरकार ला मिळू शकणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल ओशो आश्रम बुडवीत असल्याकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले.
ओशो ट्रस्टवर प्रशासक नेमण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविणार तसेच ओशो अश्रामात बुद्ध हॉल मध्ये लावण्यात आलेली भगवान बुद्धांची मूर्ती ओशो ट्रस्ट ने काढली असून तिथे पुन्हा बुद्ध मूर्ती स्थपन करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष ओशो आश्रमात घुसून बुद्ध मूर्ती उभारेल असा ईशारा रामदास आठवले यांनी आज दिला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे ओशो आश्रमाची 20 एकर जागा आहे. ती बेकायदेशीरपणे विकण्याचा डाव आश्रम संचालकांचा आहे. जमीन विकल्यानंतर त्याचा पैसा थेट परदेशात पाठविण्यात येत आहे. ओशो आश्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणारे 5 हजार रुपये शुल्क त्यातून आश्रमाला कोट्यावधींचा निधी मिळत असून तो निधी भारतातील बँकांमध्ये न ठेवता परदेशातील बँक खात्यात पाठविला जात आहे. पुण्यातील ओशो आश्रमातील बुद्धा हॉल मधील बुद्ध मूर्ती आश्रम संचालकांनी गायब केली आहे. त्या बुद्ध मूर्तीची पुन्हा बुद्धा हॉल मध्ये स्थापना करण्यात यावी अशी मागणी ओशो अनुयायांनी केली आहे.
ओशो यांनी लिहिलेली पुस्तके आणि इतर वस्तूंची रॉयल्टी स्वरूपात कोट्यावधी रुपये ओशो आश्रमास मिळत असून ती रक्कम भारतात येत नसून ओशो इंटरनॅशनल च्या नावाने परदेशात जात आहे. ओशो हे जन्माने कर्माने भारतीय आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपदेशाचा कमाईसाठी वापर करणे,पुस्तकांवर रॉयल्टी असू शकेल पण विचारांवर रॉयल्टी कशी मागू शकाल असा सवाल करीत ओशो यांनी निस्वार्थ सेवेला महत्व दिले आहे.मात्र ओशो इंटरनॅशनल ही ट्रस्ट ओशो यांच्या आश्रमाच्या पवित्र्याचा भंग करीत आश्रमाला रिसॉर्ट करून कमाई चे सधन करीत आहेत.त्याचा ओशो अनुयायांनी निषेध केला आहे. ओशो आश्रमात येणारा पैसा, होणारे व्यवहार,जमीन विक्री आदींची भारत सरकार ने सखोल चौकशी करून ओशो आश्रमात भक्तांसाठी अनुयायांसाठी विनामूल्य खुला करावा अशी मागणी ओशो अनुयायांनी केली असून या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
