कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्त नागरिकांना 8 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास या भागात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात दिला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे केवळ विशिष्ट लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.
महापूर येऊन दोन महिने उलटले. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे देणार की नाही, आणि देणार असाल तर कधी देणार, किती देणार हे जाहीर करा असे आवाहन करतानाच आठ दिवसात मदत न मिळाल्यास मंत्र्यांना भागात फिरणे मुश्कील करू, त्यांच्या गाड्या आडवू,असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, असा टोलाही शेट्टींनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा – जयंत पाटील
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
