Share

‘खरकट्या पत्रावळ्या चाटायच्या आणि आपणच जेवणावळी घातल्या असा रुबाब दाखवायचा ही शिवसेनेची सवय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी कामगारां साठी जाहीर केली. मात्र आता याच ई- श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर करण्यात आले आहे. त्याचे ई-शिव आधार कार्ड योजना असे नामांतर करून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

भाजपचे अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर करण्यात आले असून शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या चाटायच्या आणि आपणच जेवणावळी घातल्या आहेत असा रुबाब दाखवायचा ही शिवसेनेची सवय आहे.’ असे खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी या योजनेचा लाभ आपल्या माध्यमातून देण्यासाठी पुढाकार घेत या योजनेचे नाव शिव आधार केले आहे. या माध्यमातून नागरिकांची योजनेसाठी नोंदणी करण्याचे कार्य सुरु आहे. मात्र योजनेचे स्वरूप केंद्राचे असून नामांतर करून त्याचे श्रेय घेतले जात असल्याचा आरोप आता भाजपकडून केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!