Share

महिलांवरील अत्याचार रोखण्यास महाविकास आघाडी सरकार कुचकामी- सिद्धेश्वर लटपटे

Published On: 

औरंगाबाद : सध्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये भयपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. साकीनाका (मुंबई) परिसरातील व परभणी जिल्ह्यातील सोनपेठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाला व त्या पीडित निर्भयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सर्वात महिलांवरील अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार कुचकामी ठरले असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केला आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि मन सुन्न करणाऱ्या या घटना आहेत. या संपूर्ण घटनांची गांभीर्यता लक्षात घेता राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व नारी शक्ती मंच यांच्या वतीने महात्मा फुले चौक, सुतगिरणी चौक, टी.व्हा.सेंटर, मोहटादेवी चौक वाळूज या ठिकाणी एकाच वेळी भर पावसात निदर्शने करण्यात आली. बलात्काऱ्यांना फाशी द्या, महिलांवर अत्याचार बंद करा, ठाकरे सरकार जागे व्हा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना या दिवसेंदिवस वाढणे अत्यंत दुर्देवी आहे. ठाकरे सरकार वाढत चाललेल्या घटना रोखण्यास अपयशी ठरल्याचे मत लटपटे यांनी व्यक्त केले. निदर्शन करणांऱ्या कार्यकर्त्यांना महात्मा फुले चौक या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच रात्री उशीरा त्यांना सोडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!