🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. अंधेरी कोर्टात १४ सप्टेंबर रोजी कंगना न्यायालयात उपस्थित राहीली नव्हती. त्यावर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाली आहे. मात्र यावेळी न्यायालयावरच आरोप केल्याची माहिती समोर आली आहे.
कंगना कोर्टात आपली बाजु मांडताना सांगितलं की, माझा या कोर्टावरील विश्वास उडाला आहे. मला या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करायची आहे. अंधेरी कोर्टाच्या न्यायाधीशांवर कंगनानं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीश वारंवार कंगनाला कोर्टात का बोलावत आहेत. वॉरंट जारी करण्याची धमकी दोन वेळा दिली गेली. तिचे वकील प्रत्येक सुनावणीला हजर होते. कंगना देखील याआधी कोर्टात आली होती. त्यामुळे तिला कोर्टात बोलवण्याची गरज का? या न्यायाधीशांवर विश्वास नाही, त्यांना बदलण्याची मागणी कंगनानं वकिलांमार्फत केली आहे.
दरम्यान, कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अंधेरी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
