कराड – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. किरीट सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली.
आजही त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत.
मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्या आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील ईडीच्या तक्रारीमुळेच माझ्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. माझ्या जीवाला धोका असल्याचं, माझ्यावर गनिमी काव्याने हल्ला होणार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मग, पोलिसांना ही माहिती कोणी दिली? असा सवालही किरीट सोमैय्यांनी विचारला आहे. दरम्यान, मुश्रिफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘सोमय्यांना रोखून भ्रष्टाचारावर पांघरूण पडेल’, या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे’
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
