Share

‘अध्यादेश काढणे ही ठाकरे सरकारकडून ओबीसींची दिशाभूल’, ‘वंचित’ची टीका

Published On: 

🕒 1 min read

अकोला : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून घमासान सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाने या मुद्द्यावर अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय सहा जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना जास्तीत जास्त आरक्षण मिळावे, यासाठी हे पाऊल टाकले आहे. हा अध्यादेश तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर असेल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या अध्यादेशामुळे ओबीसींच्या ९० टक्के जागा वाचतील व उर्वरित १० टक्के जागांसाठी न्यायालयीन लढाई लढणारच आहोत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मात्र, स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढणे ही ओबींसीची दिशाभूल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीने केली. ज्याप्रमाणे गरीब मराठा आरक्षणाची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांनी वाट लावली; त्याचप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण हे चारही पक्ष करीत आहे. या फसवणुकीच्या षडयंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने जि.प. आणि पं.स.मधील त्या जागाच रिक्त झाल्या हाेत्या. त्यामुळे पोट निवडणूक होत आहे. ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नमानिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळेच सरकारने काढलेला अध्यादेश म्हणजे ओबीसींची दिशाभूल करण्याचे षडयंत्र आहे. कारण या अध्यादेशाने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता नाहीच, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचे म्हणणे आहे.

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डेटाची अट घातली. पण डेटा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारकडे इम्पिरिकल डेटा नाही. भविष्यात हा डेटा झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारने आम्ही ५० टक्क्यांच्या अधीन राहून ओबीसींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढला, असा दावा केला. मात्र असा अध्यादेश काढणे हे ओबीसी ची मते मिळवण्यासाठी चाललेले नाटक आहे, अशी टीका वंचितच्या नेत्या ठाकूर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!