मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील याने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल टोकाचे उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी मनोजला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी आता मनोज पाटीलचे कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. साहिल खानवर मनोजच्या कुटुंबाने आरोप केला आहे. त्यामुळे याबाबत आता दाद मागण्यासाठी ते राज ठाकरे यांची मदत घेणार आहे.
आत्महत्यापूर्वी मानसिक त्रास आणि बदनामीमुळे हे पाऊल उचलत असल्याचे मनोजने चिठ्ठीत लिहिले होते. मिस्टर इंडिया झालेल्या मनोजने मिस्टर ऑलंपियासाठी तयारी सुरु केली होती. साहिल खान देखील या स्पर्धेत भाग घेऊ इच्छित होता. यामुळे आपल्याला त्यापासून दूर करण्यासाठी व मिस्टर ऑलंपिया स्पर्धेत भाग न घेण्यासाठी साहिल त्रास देत होता, असा आरोप मनोजने केला आहे. सध्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकार मागास प्रवर्गासाठी जो सुधारित अध्यादेश काढणार आहे तो नेमका आहे तरी काय ?
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- ‘७२ तासात माफी मागा, अन्यथा…’; अनिल परबांचा किरीट सोमय्यांना इशारा
- ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक
- ‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
