🕒 1 min read
मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर परब यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स देखील बजावला होता. परंतु आता आरोप करणाऱ्या सोमय्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठी परब यांनी संपूर्ण तयारी केली आहे.
याबाबत बोलताना परब म्हणाले कि, ‘तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे.’ त्यामुळे परब यांनी तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी सोमय्यांना दिला आहे.
येत्या ७२ तासात लेखी माफीनामा हा कमीतकमी दोन इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावा आणि तुमच्या ट्विटर हँडलवर ते ट्विट करुन पीन करुन ठेवावं, असं अनिल परब यांनी नोटीसीमध्ये म्हटलं आहे. तसंच, अनिल परब यांच्याविरोधात जे ट्विट करण्यात आले आहेत ते सर्व ट्विट हटवावे, असं अनिल परब यांनी वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना सूचना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नाही, ते सोयीप्रमाणे काम करतायत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- गणेशोत्सव भोवणार; कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ
- पोटनिवडणुका जाहीर; ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चेत तोडगा काढणार-विजय वडेट्टीवार
- मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीमध्ये बसून निर्णय घेतात आणि जनतेवर निर्बंध घालतात – पाटील
- ‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
