मुंबई – मराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं असं म्हणतानाच भाजपशी युती हाच पर्याय असल्याचं म्हटले आहे. मराठा मार्ग या मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात ही भुमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेसाठी ब्रिगेड आपला पारंपरिक विरोध गुंडाळून ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भांडारकर संस्थेवर हल्ला करणारी, दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याला विरोध करणारी आणि राष्ट्रवादीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या ब्रिगेडच्या भुमिकेत सत्तेसाठी इतका बदल कसा काय होतो आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमधे रंगली आहे. दरम्यान हा ब्रिगेड मध्ये फूट पडल्यानंतर आणि फाटाफूट झाल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठा हा बदल आहे का असाही सवाल विचारला जातो आहे. खेडेकरांची ही भुमिका त्यांचे सहकारी मान्य करणार का ते पहावं लागेल.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. त्यामुळे अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात दिसत असली तरी त्यांचा भाजपसोबत नेहमीच घरोबा राहिलाय.
मधल्या काळात संभाजी ब्रिगेडमधे फुट पडून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडच्या गटाने राजकीय पक्ष म्हणून निवडणुक लढवायचं ठरवलं तर प्रविण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या दुसऱ्या गटाने सामाजिक संघटना म्हणून काम करायच ठरवले आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाच असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकार मागास प्रवर्गासाठी जो सुधारित अध्यादेश काढणार आहे तो नेमका आहे तरी काय ?
- बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्टेडियममध्ये बसून घेता येणार आयपीएल मॅचचा लाईव्ह आनंद
- ‘७२ तासात माफी मागा, अन्यथा…’; अनिल परबांचा किरीट सोमय्यांना इशारा
- ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक
- ‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’

