🕒 1 min read
सोलापूर : सोलापूर शहरामध्ये 4 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत होता. वारंवार महापालिकेकडे याबाबत तक्रार करुनही पालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. म्हणून सत्ताधारी पक्ष भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाविरोधात शोले स्टाईल आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘पाण्यासंबंधीच्या तक्रारी लवकर दूर करेल, असं आश्वासन महापालिका आयुक्तांनी महिन्याभरापूर्वी दिले होते. पालिकेचे अधिकारी देखील नगरसेवकांची दखल घेत नाहीत’, असं म्हणत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. ‘पाणी द्या नाहीतर टाकीवरुन उडी मारेन’ असा इशारा देत ‘अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही’, असंही भोसले म्हणत होते. अखेर स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी खाली आणले.
पोलीस आयुक्तालयांसमोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर नगरसेवक भोसले हे चढले. भोसले यांनी पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ‘उन्हाळ्यात पाणी पुरवठा 2-4 दिवसांनी होत असेल तर नागरिक समजून घेतील, पण ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या काळात 4 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संतापले असल्याचं भोसलेंनी सांगितलं आहे.
‘याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना देऊन, बैठका घेऊनही हा पाणी प्रश्न सोडवला जात नाही’. भाजपच्या नगरसेवकाला आंदोलन करण्याची वेळ आली असून महापालिका आयुक्तांविरोधात हे शोले स्टाईल आंदोलन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- ‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

