🕒 1 min read
अहमदाबाद : गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटल्यावर त्यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने राजीनामा दिला असून, गुजरातला आता नवे नेतृत्व मिळेल असे सांगितले आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षाता कालानूसार बदल केले जातात. पक्षात ही एक ठरलेली प्रक्रिया आहे. मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला यापुढे जी जबाबदारी मिळेली ती मी पार पाडेल. मी पद नाही तर जबाबदारी हा शब्द जाणीवपूर्वक वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ‘मला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती मी पुर्ण केलेली आहे. आम्ही राज्याची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लढलो होतो. आणि २०२२ ची निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवली जाईल’ असेही रुपाणी यांनी स्पष्ट केले.
रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी दुसऱ्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपाने गुजरातमध्ये १८२ जागांपैकी ९९ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले होते. दरम्यान, विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याने गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची सुत्रे कोणाच्या हातात देण्यात येणार, याबाबत चर्चा सुरू आहे.
पक्षातील अंतर्गत कलहामुळे रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपात वेळेनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली असून यापुढे पक्षासाठी काम करणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
- ‘अत्याचाराच्या घटना सुरूच, सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत?’
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
