🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या दुर्दैवी घटनेतील मृत महिलेला श्रद्धांजली वाहताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘साकीनाका अत्याचार पीडित दुर्दैवी महिलेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विनम्र श्रद्धांजली. ठाकरे सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था सरणावर गेली आहे. सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत. गुन्हेगारांना धाक कसा असेल?’ असा सवाल करत अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
साकीनाका अत्याचार पीडित दुर्दैवी महिलेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विनम्र श्रद्धांजली.
ठाकरे सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था सरणावर गेली आहे. सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत. गुन्हेगारांना धाक कसा असेल??? pic.twitter.com/REr4mIOzn7— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2021
विकृत वृत्तीचा कळस; संतापजनक कृत्य
पीडित महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. चाकूने हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही, तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,आरोपीला फाशीच द्या – भाई जगताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
