मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील 32 वर्षीय बलात्कार पिडीत महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं.
दरम्यान, महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या प्रकरणी आरोपी मोहन चौहान (वय 45) याला घटनेनंतर अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एक आरोपी पकडला आहे. मी पोलिसांशी बोललो. निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. थोड्या कालावधीत एका आरोपीपर्यंत पोहोचलो. इतर आरोपीही पकडले जातील. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- गणेश पुजनासाठी गेल्याने ट्रोल झाली अर्शी खान; मात्र व्हिडिओच्या माध्यमाने दिलं तडेतोड उत्तर
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण


