Share

‘डियर तु खुप सुंदर आहेस, म्हणत विद्यापीठातील जनसंपर्क अधिकाऱ्याची विद्यार्थीनीसोबत लगट!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्याविरूध्द विद्यार्थीनीने विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून लगट करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला असून प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थीनीने केली आहे. दरम्यान, असे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला काळे फासण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) नागराज गायकवाड यांनी दिला आहे.

कामाच्या ठिकाणी महिला व विद्यार्थी यांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३ व विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम २ मे २०१६ नुसार अंतर्गत तक्रार समितीच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी २७ ऑगस्टला विद्यार्थीनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या दालनात गेली होती.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु, शिंदे यांनी चेहरा पाहण्यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले. त्यानंतर ३ सप्टेंबरला रात्री १० वाजून ३८ मिनिटांस व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून मॅसेज पाठविले. ‘डियर तु खुप सुंदर आहेस. तु पहिल्या नजरेत आवडलीस. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. असे संवाद साधले. त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर बोल नाना, तुला राग आला का? असे प्रतिप्रश्न करून नंतर मॅसेज डिलीट केले. यापूर्वीही त्यांनी अनेक मुलींसोबत असे प्रकार केले आहेत. या प्रकरणाची माहिती, पीडीतेने आंबेडकरवादी चळवळीचे नागराज गायकवाड यांना दिली. त्यांनी पीडीतेला बेगमपुरा ठाण्यात नेत तक्रार दाखल केली. त्यावरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात ३५४, ५०९ कलमांतर्गत संजय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!