मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला म्हणजे दि. ९ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही समारंभाला मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देसाई म्हणाले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने विमानतळ प्रकल्प हाती घेऊन काम पूर्ण केले. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली असून ५२० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विमान पत्तन प्राधिकरण नागर विमानन महानिदेशालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने आता प्राप्त झाले आहेत.
पत्रकार परिषदेत नारायण राणे यांचे नाव घेण्याचे देसाई यांनी टाळले. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असतील. शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोण केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहे याची माहिती नाही, असे देसाई यांनी सांगितले. विमानतळ उद्योग विभागाचा आहे. त्यामुळे त्याचा मंत्री म्हणून मी स्वागताला असेन, असे देसाई यांनी यावेळी सांगितले.
चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावलेच पाहिजे असे काही नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केले होते. त्यावरून राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वादाला आणखी एक फोडणी मिळाली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल राणे यांना नुकतीच अटक झाली होती. त्यानंतर नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळ उद्घाटनप्रसंगी एका व्यासपीठावर प्रथमच येत आहेत. त्यामुळे येथे आता वादाची ठिणगी पडते का, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
