बीड : करुणा शर्मा यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर लक्ष्य करत त्यांच्यावर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या दरम्यान ५ सप्टेंबरला करुणा परळीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या गाडीत बंदूक सापडल्याचेही समोर आले. तसेच हायव्होल्टेज ड्रामा घडून जिवे मारण्याची धमकी व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात कोलाहल माजलेले आहे.
या सर्व घडामोडीनंतर भारतीय जनता पक्ष करुणा शर्मा यांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार आहे. तशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. ‘करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झालाय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे’, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आलीय. तसंच करुणा शर्मा यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय.
गेल्या काही दिवसांपासून करुणा या वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर टोकाचे आरोप करत आहेत. त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यापूर्वीही करुणा यांच्या बहिणीने धनंजय यांच्यावर थेट अत्याचाराचे आरोप केले होते. काही काळातच ते आरोप आणि तक्रार त्या महिलेने मागे घेतले. मात्र, या सर्व कालावधीत बीड भाजपा शांतच राहिली. जिल्ह्यातील एकाही नेता अथवा पदाधिकाऱ्याने थेट धनंजय मुंडे यांचा विरोध अथवा करुणा यांना पाठिंबा दिला नव्हता. एवढेच नव्हे तर पंकजा मुंडेंनी देखील मौन बाळगले. पण आता करुणा यांना परळीत आल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रथमच भाजपने ठोस भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
‘ज्याप्रमाणे परळी येथे सगळे प्रकरण घडले आहे, ते पाहता सकृतदर्शनी शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसते. रिव्हॉल्व्हर प्रकरण व अॅट्रॉसिटी केस याबाबत संशयास्पद भूमिका आहेत. हा आता न्यायालयीन विषय आहे. मात्र, भाजप कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. न्यायासाठी लढणार आहे’, अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मांडली आहे
पंकजा मुंडे यांनी मौन सोडले
‘अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत, हा विश्वास हरवू नये. चुकीचा पायंडा पडू नये, ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे, राज्याची’ अशा शब्दांत माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी करुणा शर्माप्रकरणी मंगळवारी (७ सप्टेंबर) साेशल मीडियावर संदेश पाठवत मौन सोडले.
करुणा शर्मा यांच्या जामीनावर मंगळवारी सुनावणी
दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर करुणा शर्मा यांनी आज बुधवारी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.१४) सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवार आणि मंगळवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला. इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत त्यांच्या वकिलाशिवाय कोणीही आले नाही. तसेच कोरोनामुळे कारागृहातील भेटीही बंद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
