Share

मिलिंद सोमणची रुग्णालयातील पोस्ट पाहून नेटकरी संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण बऱ्याचदा सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो.त्याच्या फिटनेसच्या बाबत नेहमीच चर्चा होत असते. आजही तो एखाद्या तरुणाला लाजवेल असे फिट राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र यावेळी त्याने चक्क सीटी स्कॅन करतानाचा फोटो शेअर केला आहे. हे पाहून सर्वानाच आश्चर्यचा धक्का बसला आहे.

मिलिंदने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो सीटी स्कॅन मशीनवर बसलेला दिसत आहे. आयर्नमॅनवर सीटीस्कॅन करण्याची वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला. चाहत्यांच्या प्रश्नाला खुद्द मिलिंदनेच उत्तर दिलं होय, सगळं काही नॉर्मल आहे, असे त्याने स्पष्ट केले. ‘बेंगळुरूमध्ये सीटी स्कॅन झालं. ब्लॉकेज इत्यादी तपासलं गेलं. सगळं काही सामान्य आहे,’ असं त्यानं स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/CTbsT2pIgzy/?utm_source=ig_embed&ig_rid=63036403-334d-45df-91e7-77da07cd53c6

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं आहेच. पण तुम्ही काय करता हेही महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या रोजच्या आहाराची योग्य सवय, नियमित व्यायाम, योग्य झोप शिवाय ताणतणावाचं व्यवस्थापनही तेवढंच महत्त्वाचं आहे, असं त्यानं लिहिलं.

मिलिंदने लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीने हि पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्याच्या पोस्टवरून मिलिंद सोमणला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत आहे. तसेच त्याच्या पोस्टवरून नेटकरी त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!