🕒 1 min read
पुणे : शिवसेना खासदार व नेते संजय राऊत हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन मागर्दर्शन करत आहेत. दरम्यान, शिरुर मधील मेळाव्यात राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच मतदारसंघात पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
‘गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातील पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. सरकार आपलं असताना पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर,’ असं म्हणत दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही राऊत यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे आहे. यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.
‘पुण्यातील शिरुर तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना या पाणी प्रश्नावर लढणाऱ्यांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातील पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. सरकार जरी आपले असेल तरी आपले प्रश्न मात्र तेच आहेत. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होतात. आधी म्हणायचो आपलं सरकार येऊ दे मग खोटे गुन्हे दाखल होत असेल तर मग पाहू. आता जर सरकार आपलं असेल आणि पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर असून मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलेन,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जीव धोक्यात घालायचा असेल तर पहिला नंबर माझा असेल; राजू शेट्टींचा एल्गार
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- संघासारख्या देशभक्तांमुळे भारत हिंदुराष्ट्र होतोय म्हणून ते निराश; राणेंची अख्तर यांच्यावर टीका
- पेंग्विनवरुन राजकारण करणारे पेंग्विन पाहून मजा घेतात; महापौरांचा टीकाकारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
